• आजची गझल • (भाग ५३ )
नुसता खयाल आहे
हृदयात भावनांचा उठतो बवाल आहे
कैफात मैफिलीच्या उडतो गुलाल आहे
नादावलो असा की दुनियेस ही विसरलो
गझले तुझ्याच पायी झालो हलाल आहे
सांगून टाक मजला वागू कसा तुझ्याशी
नंतर नको म्हणू की भलता जहाल आहे
हळवा तुझा किनारा, का भावतो मनाला
आहेस जिंदगी की नुसता खयाल आहे
गर्दीत माणसांच्या सांभाळतो स्वतःला
माणूस माणसाचा झाला दलाल आहे..
ओळख दिली मला तू गझले कवी म्हणूनी
फिटतील पांग कैसे पडला सवाल आहे
गझले अशी दडूनी हृदयात खोल बसली
आता तुझ्या विना हे जगणे मलाल आहे.
आशा साळुंखे
जळगाव
मो. 7499174252
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=