Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्यावरील गुन्ह्याचा स्वरूपात वाढ

तळोदा येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक यांच्यावरील गुन्हा संदर्भात पूरवणी जबाब घेण्यात आले.पोलिस निरीक्षक तळोदा. राहुलकुमार पवार नोंद करितो की, आमचे कडील तपासवर असणारे फौ. गुरनं. 230/2023 भा.द.वि. कलम 420, 494,504 मधील पिडीत महिलेने  सदर गुन्हयांचे संदर्भाने पुरवणी जबाब नोंदविला की, त्या आदिवासी समजाची अबला स्त्री असुन आरोपीत नितीन सुकदेव चव्हाण हे कोळी समाजाचे आहे व त्यांनी त्याचे पहिल्या पत्नी सोबत फारकत घेऊन फिर्यादी हिचेशी लग्न करणार असे सांगितले. तसेच नंदुरबार येथे तिची ईच्छा नसतांना बळजबरीने शारिरिक संबंध केले. तसेच धुळे येथे देखील वारंवार शारीरिक संबंध केले व आरोपीताची आई  यांनी फिर्यादीने गर्भपात करावा म्हणुन शारीरिक व मानसिक छळ केला व माहे एप्रिल महिन्याचे सुमारास धुळे येथे घरी असतांना आरोपीतांचे मोठे भाऊ दिनेश सुकदेव चव्हाण व यांना घराबाहेर ओढुन काढुन अश्लिल शिवीगाळ केली व आरोपीत नितीन चव्हाण यांनी तु आदिवासी भिलटी, तुझे माझे सोबत पत्नी म्हणुन राहण्याची लायकी तरी आह का, तुझ्या सारख्या छप्पन्न माझ्या मागे फिरतात असे सांगुन जातीवाचक शिवीगाळ केली वैगरे मजकुराचे पुरवणी जबाब दिल्याने सदरचे गुन्हयामध्ये भादवी कलम 376 (N), 294,34 सह अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 1989 चे अधिनियम 2015 चे कलम 3 (1) (r) (s),3(2) (va) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे. तसेच सदर गुन्हयामध्ये अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंध कायदान्वये कलम वाढ करण्यात आल्याने सदर बाबत मा. पोलीस अधिक्षक सो.नंदुरबार यांना कळविण्यात आले असता त्यांचे मौखीक आदेशान्वये सदर गुन्हा मा.सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो. अक्कलकुवा विभाग यांचेकडेस सदर गुन्हयांचा तपास मुळ कागदपत्र व केस डायरीसह वर्ग करण्यात आले बाबत नोंद.