🌹कशाला🌹
पिंजऱ्यातला आत्मा म्हणतो मलाच कारावास कशाला
श्वास उधारी घेत जगावे उगाच अट्टाहास कशाला
एक साल गेले तर गेले दुष्काळाची भीती कशाला
स्वप्न उद्याचे पेर नव्याने आवळतो गळफास कशाला
माहित आहे तुझी सांत्वना वरवरचा
देखावा नुसता
तुझ्या पुढे मी मांडायाची दु:खाची आरास कशाला
आटपाट नगरीतिल राणी अजूनही जर व्यथा भोगते
शुक्रवारच्या कथानकावर ठेवू मी विश्वास कशाला
आठवणीच्या फांदीवरती बारामाही वसंत आहे
कळ्या फुलांना फुलण्यासाठी पुन्हा नवा मधुमास कशाला
रेखा कुलकर्णी
चिंचवड, पुणे
मो. 8411958226
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=