आदिवासी सुरक्षा यात्रेचे बिरसा फायटर्सने केले जोरदार स्वागत!
शहादा दि ३० (प्रतिनिधी) झारखंड हून महाराष्ट्रात दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी म्हसावद ता.शहादा ता.नंदुरबार येथे आलेल्या आदिवासी सुरक्षा यात्रेचे बिरसा फायटर्स कडून जोरदार स्वागत करण्यात आले.क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा,शाल,श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.राजू वलवयजी आदिवासी सुरक्षा यात्रा आयोजक,केतनभाई बामणीया आदिवासी सुरक्षा यात्रा समिती सदस्य,आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित,बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक,सत्तर दादा ठाकरे अध्यक्ष देवमोगरा माता मंडळ म्हसावद आदि मान्यवर उपस्थित होते.
बिरसा फायटर्स तर्फे सत्कार करताना सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष, गणेश खर्डे राज्य उपाध्यक्ष, जालिंदर पावरा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, संदीप रावताळे शहादा तालुकाध्यक्ष, राहुल चव्हाण वडगाव गाव शाखा अध्यक्ष,प्रभूदत्तनगर गाव अध्यक्ष विकास पावरा,गणोर, राणीपूर, वडगाव,प्रभूदत्तनगर गाव शाखा पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येचे उपस्थित होते.
आदिवासी विचारधारेला एक करणे,आदिवासींची सांस्कृतिक शुद्धीकरण करणे व सामाजिक आणि राजकीय जागृतता करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे,असे आदिवासी सुरक्षा यात्रा समितीचे सदस्य केतनभाई बामणिया यांनी सांगितले.महाराष्ट्रात बोगस आदिवासींचा गंभीर विषय आहे,त्या विरोधात आमची न्यायिक लढाई सुरू आहे,बोगस आदिवासींविरोधात लढणे हा सुद्धा मुद्दा या यात्रेचा उद्देश असावा,असे मनोगत जिल्हा परिषद नंदूरबार उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी व्यक्त केले.या यात्रेद्वारे देशातील सर्व आदिवासींना एक करणे,मणिपूर येथील आदिवासींवर झालेल्या अत्याचारांवरून आपला आदिवासी हा असुरक्षित आहे,आदिवासींना आत्मनिर्भर बनवणे,बोगस आदिवासींविरोधात आवाज उठवणे,कुठल्याही राजकीय पार्टीचे गुलाम आदिवासींनी बनू नका,वोटबॅन्क बना,आदिवासींची स्वंतत्र राजकीय पार्टी असावी,सर्व आदिवासी संघटना व आदिवासी पार्टी यांना एकत्रित करणे,हाही उद्देश या आदिवासी सुरक्षा यात्रेचा आहे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून राजू वलवयजी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या कार्यक्रमाला बिरसा फायटर्स बरोबरच आदिवासी टायगर सेना,आदिवासी एकता परिषद व देवमोगरा माता मंडळ म्हसावद येथील कार्यकर्तेही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी भाषेत सुशिलकुमार पावरा यांनी केले तर आभारप्रदर्शन अजय गावित यांनी केले.शेवटी स्नेहभोजन करण्यात आले.