Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राहत नाही लपून काही

• आजची गझल •    (भाग ५५ )


रहात नाही लपून काही

का थांबलीस बोल तू सखे अजून काही 
मनातले ते रहात नाही... लपून काही 

साधी सोपी वाट रोजची आहे माझी 
टाकतो तरी आज पावले... जपून काही 

पोटापुरते मला मिळाले...लोभ कशाला 
असा तसाही मजेत आहे... नसून काही 

स्वप्नांची मी राख लावली जरा कपाळी 
नवे उगवेल नव्या दमाने... जळून काही 

मनातले मी जरा मोकळे बोलत गेलो  
माफी द्या मज बोललोच जर चुकून काही 

डॉ. सुभाष हरिबा कटकदौंड खोपोली, रायगड
मो. ९५६१२८४४०८

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=