हिंस्वम वार्षिक सभा संपन्न
आपल्या हिन्दवी स्वराज्य महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पुणे येथील लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या सभागृहात संपन्न झाली. अध्यक्ष श्रीमंत शिवाजीराजे भोसले, तंजावर हे तब्येतीच्या कारणास्तव अनुपस्थित होते. कार्याध्यक्ष श्रीमंत सुचेताताई पेशवा यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज झाले. सहमंत्री श्री योगेश्वर गंधे यांनी वार्षिक अहवाल व विविध विषय मांडले. मावळते वरिष्ठ उपाध्यक्ष श्री विक्रमसिंह मोहिते यांनी कामकाजाबाबत सांगोपांग चर्चा केली. पूर्वी झालेल्या सर्वप्रकारच्या चूका तातडीने सुधारून घेण्याचा व महासंघाचा विस्तार करण्याचा सर्वसंमतीने ठराव करण्यात आला. विविध घराण्यातील महासंघाचे 25 सदस्य सभेस उपस्थित होते. नूतन सहमंत्री श्री. समीरराव पोतनीस यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष श्री. सुशील जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
नूतन प्रधान मंडळ निवड
महासंघाचे 2023-2027 सालाकरीता नूतन प्रधान मंडळ बिनविरोध निवडण्यात आले. महामंत्रीपदी श्री. योगेश्वर गंधे (सरदार गंधे घराणे) यांची निवड करण्यात आली. श्री. समीरराव पोतनीस (सरदार मुरारबाजी घराणे) व श्री. रविन्द्रराव कंक ( सरदार येसाजी कंक घराणे) हे सहमंत्री निवडण्यात आले आहेत.
या वार्षिक सभेत श्रीमंत अमरजीत राजे बारगळ जागीरदार हे पुनश्च दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले ते सदर सभेला उपस्थित राहू शकत नव्हते म्हणून त्यांची कन्या डॉ श्वेता चौधरी बारगळ यांनी प्रतिनिधित्व केले सर्व उपस्थित सरदार घराण्याचे प्रतिनिधी घराण्याचे प्रतिनिधींचे पदाधिकारी म्हणून सरदार योगेश्वर गंधे सरदार समीर राव पत्नीस सेनापती घराण्याचे प्रतिनिधी श्री मंत रवींद्र कुमार कंक या सर्वांचे अभिनंदन तथा सर्व उपस्थित घराण्याच्या प्रतिनिधींना धन्यवाद !
डॉ. श्वेता चौधरी बारगळ