Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार राजेश पाडवी यांनी बिबट्या हल्ला प्रकरणी अधिका-यांना खडसावले

तळोदा दि १८(प्रतिनिधी) तालुक्यातील दलेलपुर शिवारातील बिबट्या हल्ला व बालक मृत प्रकरणी वनविभागाने लक्ष मृत मुलाचा परिवारास तातडीने मदत,व बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा संबंधितांना निलंबित करण्यात येईल असे सुचित केले आहे.
             विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मतदार संघात बिबट्याचा स्वैर वावर,पशू आणि माणसांवर होणारे हल्ले याबाबत निवेदन केले होते.मात्र ठोस उपाययोजना न झाल्याने एका बालकाचा बळी गेला आहे.
         याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, दलेलपुर ता तळोदा शिवारात असलेल्या बाबू धानका यांच्या मालकीच्या शेतात खेत्या पारशी वसावे हा आपल्या नातवासह शेतात नांगर हाकत होते. त्याच शेताच्या परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने 11 वर्षीय गुरु भरत वसावे या बालकावर हल्ला चढवला व शेतात फरफटत ओढून नेत बालकाच्या मानेवर जोरदार प्रहार करत बिबट्याने चावा घेतल्याने, त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, 

त्याच्या जवळ असलेल्या आजोबांनी ते दृश्य बघितल्यावर त्यांनी आरडा, ओरड केली व स्वत:च्या जीवाची तमा न करता बैल हाकण्याचा काठीने बिबट्यास मारून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. बिबट्या त्या बालकास सोडत नव्हता त्याला घेऊन पळत असताना आजोबाने पाठलाग करत बिबट्यास बडवले बिबट्याने तेथून पळ काढला, ही घटना गावात वा-या सारखी पसरली  ग्रामस्थ घटना स्थळी दाखल झाले. व सदरची घटना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. घटनेची माहिती मिळताच तळोदा वन विभागाचे वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, वनपाल वासुदेव माळी, वनरक्षक  जाण्या पाडवी, राहुल कोकणी, आशुतोष पावरा आदींसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी करत वनविभागावर रोष व्यक्त केला. दरम्यान गुरू जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या मानेच्या मागच्या बाजूस व गळ्याचा भागाला दात उमटले होते.त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव अधिक होत असल्याने बालकास उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी तपासणी केली असता बालक मृत झाल्याचे  घोषित केले.