नंदूरबार दि १६(नंदूरबार) महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मशरूम चळवळ चालविणा-या उद्योजकांकडुन रेडीमेड मशरूम बॅग भेट दिली.या प्रसंगी संसद रत्न खासदार श्रीमती. डॉ.हिनाताई गावित व श्रीमती. डॉ.सुप्रिया गावित व उपस्थित असलेले सर्व शुभेच्छुकांचे शिवाजी महाराज नाट्यगृह नंदुरबार येथे आकर्षणाचे केंद्र ठरले होते.
मशरूम उद्योजक राजेंद्र वसावे यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीच्या लग्न समारोह, वाढदिवस व इतर कोणत्याही कार्यक्रमात रेडीमेड मशरूम बॅग तयार करून भेट म्हणून द्यायला हवे.
कार्यक्रमात जे दृश्य बघितले त्यावरून मला असं वाटतं की कोणत्याही कार्यक्रमात भेट म्हणून पुष्पगुच्छ, फुलहार देतो पण पुष्पगुच्छ व फुलहार एकदा भेट दिल्यानंतर त्यांचा काहीच वापर केला जात नाही अंततः ते फेकलेच जाते..तर आपण काही नवीन वस्तू भेट म्हणून देण्याचे केले तर?? जसे _रेडिमेड मशरूम बॅग_ जर रेडिमेड मशरूम बॅग भेट म्हणून दिली. तर समोरचा व्यक्तीला त्या वस्तू पासून आरोग्यमय फायदा होईल आणि जेणेकरून सातपुड्यातील बेरोजगार युवकांना रोजगार हि भेटेल अशी अपेक्षा यावेळी मशरूम उद्योजक राजेंद्र वसावे यांनी व्यक्त केली