सुतगिरणीचे एमडी राजाराम पाटील यांनी संपाचे बॅनर फाडून कामगाराला केली मारहाण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सूतगिरणीचे एम डी राजाराम पाटील यांना अटक करण्याची मागणी
शहादा दि २४ (ता प्र) लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ ता.शहादा जि.नंदूरबार येथील सुतगिरणीतील कामगारांनी दिनांक २२ ऑगस्टला सुरू केलेला संप तिस-या दिवशीही सुरूच आहे.आज सकाळी ८ वाजता कामगारांचा संप सुरू असताना सुतगिरणीचे एमडी राजाराम दुल्लभ पाटील यांनी संपाच्या ठिकाणी येऊन दादागिरी करत बेमुदत संपाचे बॅनर फाडले व कौसजेंद्र क्रिष्णकुमार झा वय ५० रा.सुतगिरणी होळ मोहिदा ता. शहादा यांना वाईट वाईट शिवीगाळ करत डाव्या गालावर चापट मारली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत फिर्याद अशी आहे की,लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ येथील गेटसमोर आमच्या अडी अडचणी मांडण्याकरिता व काही मागण्यांसाठी मी व माझे सहकारी संपावर बसलो होतो या कारणावरून आरोपी राजाराम दुल्लभ पाटील सुतगिरणीचे एमडी रा.सुतगिरणी होळ मोहिदा ता.शहादा यांनी वाईट वाईट शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार आरोपी राजाराम दुल्लभ पाटील यांच्या विरोधात पोलीस ठाणे शहादा येथे भा. द. सं. कलम ३२३,५०४,५०६ प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हेडकाॅस्टेबल/८१३ तारसिंग वळवी हे करीत आहेत. आरोपी राजाराम दुल्लभ पाटील यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी कामगार करीत आहेत.
आम्हाला पेन्शन दिली जात नाही,आमचे कर्जाचे पैसे पगारातून कपात करून पतपेढीत व बॅकेत सुतगिरणीचे एमडी व मॅनेजमेंट हे पाठवित नाहीत,शेतक-यांचे लाखो रूपये देत नाहीत, एमडी राजाराम दुल्लभ पाटील व उपकार्यकारी संचालक उत्तम संभू पाटील यांनी सुतगिरणीतील करोडो रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे,आमचे पैसे लुबाडले आहेत, असा आरोप उपस्थित कामगार व शेतक-यांनी केला आहे.
हम अपना हक मांगते; नही किसीसे भीख मांगते,कामगार युनियन जिंदाबाद;सुतगिरणी प्रशासन मूर्दाबाद,अशा जोरदार घोषणा कामगारांनी दिल्या.यावेळी शहादा तालुका सुतगिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष जगन निकुम, खजिनदार दत्तू भील,सदस्य दिलीप सोनवणे,कामगार काशीनाथ पाटील, मनोहर माळी,विजय पाटील इत्यादीसह हजारों कामगार उपस्थित होते.आपल्या मागण्यांसाठी दिनांक २८ ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालयासमोर लोणखेडा-मलोणी- शहादा बाजार मार्गे मोर्चा नेणार आहोत, तसे निवेदन आम्ही तहसीलदार व पोलीस निरीक्षक शहादा यांना दिले आहे.अशी जगन निकुंभ यांनी दिली आहे.