सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि २७
आज दि २७ रोजी जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बनी येथे एका हिंदू विद्यार्थ्याला त्याच्या मुस्लिम शिक्षकाने वर्गाच्या ब्लॅकबोर्डवर जय श्रीराम लिहिल्याबद्दल बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरच्या बनी येथे सरकारी माध्यमिक विद्यालयात बोर्डावर "जय श्री राम" असं लिहिल्याने सरकारी शाळेच्या शिक्षकाने आणि मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. शिक्षकांनी मारहाण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेकांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अजून तपासणी सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याचे वडील कुलदीप सिंग यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांचं म्हणणं होतं की शिक्षक फारुक अब्दुल्ला आणि प्रिन्सिपल मोहद हाफीज यांनी त्यांच्या मुलाला मारहाण केली. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्याने सांगितले की, त्याने वर्गात ब्लॅक बोर्डवर "जय श्री राम" लिहिल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या अध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .शिक्षक आणि मुख्याध्यापकाविरोधात भारतीय दंड विधान 323, 342 504, 506, 75 असे आरोप लावण्यात आहेत. कठुआ येथील घटनेनंतर उपायुक्तांनी अधिसूचना जारी करुन याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.