आदिवासी एकात्मिक प्रकल्प शासकीय आश्रम शाळेत
कुठे विद्यार्थी दुर्दैवी मृत्यू,तर कुठे नाश्त्यात अळ्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सोडवा-बिरसा फायटर्स
तळोदा दि १५(प्रतिनिधी)जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेतील समस्याकडे लक्ष देऊन सोडविण्यात यावे यासाठी बिरसा फायटर्सने मुख्यमंत्री,आदिवासी विकासमंत्री,आयुक्त नाशिक,प्रकल्प अधिकारी तळोदा व नंदुरबार यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,स्वातंत्र्यांच्या ७६ वर्षानंतरही आदिवासी शासकीय आश्रम शाळेत आरोग्य,शिक्षण,चांगला आहार,शुद्ध पाणी व इतर मूलभूत भौतिक सुविधेचे अभाव आहे.जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळा तोरणमाळ ता.धडगांव येथे काही दिवसांपूर्वी एका पहिलीत शिकणाऱ्या विदयार्थ्यांच्या झोपेत दुर्दैवी मृत्यू झाला.त्या ठिकाणी ९५० विद्यार्थी संख्या असतांना एकाच अधीक्षकांवर जबाबदारी होती.आश्रम शाळेतील वाढते विद्यार्थी मृत्यूला जबाबदार संबंधित सरकार,प्रशासन व शालेय प्रशासन असल्याचे निदर्शनास येत आहे.तसेच,दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजी शासकीय आश्रम शाळा चीरखान ता.शहादा येथे सकाळी नाश्त्यात अळ्या आढळून आल्या.सेंट्रल किचन शेडकडून कसेबसे घाईगडबळीत तयार केलेले निकृष्ट दर्जाचे जेवण,लांबून ४० ते ५० किलोमीटरहुन जेवण आणत असल्याने पॅकिंग जेवण खराब होते,जेवणही कमी मिळते.त्यासाठी स्थानिक ठिकाणी म्हणजे आश्रम शाळेतच जेवण तयार करणे आवश्यक आहे.वारंवार मागणी करून देखील सरकार संबंधित प्रशासन याकडे मुद्दाम दुर्लक्ष करून आदिवासी विदयार्थ्यांच्या जीवाची खेळत आहे.अनेक आश्रम शाळेत अध्यापन करण्यासाठी विषय शिक्षक नसल्याने विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे.जिल्ह्यातील काही आश्रम शाळेत शालेय साहित्य व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदीसाठी डिबीटीची रक्कम दोन वर्षानंतरही मिळत नाही;हे दुर्दैव आहे.नामांकित शाळा,एकलव्य मॉडेल स्कुल व वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया कधीच वेळेवर होतांना दिसत नाही.पहिले सत्र संपत येते;तोपर्यत नामांकित व वसतिगृह प्रवेश प्रक्रिया होत नसल्याने पालक,विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात.परिणामी विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.अद्यापही नामांकित शाळेची निवड यादी लागलेली नाही.आदिवासी विभागाची उदासीनता,नियोजनशून्य कारभार दिसून येतो.आश्रम शाळा,वसतिगृह व एकलव्य निवासी शाळेत शुद्ध पाणी,शैक्षणिक गुणवत्ता,विदयार्थ्यांचे आरोग्य,चांगला आहार व इतर भौतिक सुविधा या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे.शासकीय आश्रम शाळेतील विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वरील गोष्टींकडे लक्ष देऊन अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.अन्यथा,लवकरच आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण खर्डे,सहसंघटक सतीश पाडवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी,रोहिदास वळवी तर नंदुरबार प्रकल्प अधिकारी यांना नंदुरबार तालुकाध्यक्ष किसन वळवी,उपाध्यक्ष साहेबराव कोकणी,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,प्रफुल्ल वसावे,प्रेम वसावे यांच्या सह्या आहेत.