Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती साजरी, महिला व बालगोपालांत उत्साह

तळोदा दि २६ (प्रतिनिधी)तळोदा सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.                   
       यावेळी समाजाचे अध्यक्ष घनश्याम सोनार, उपाध्यक्ष आनंद सोनार यांच्या हस्ते सपत्निक प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. 
          यावेळी आनंद सोनार यांनी थोडक्यात संतांचा परिचय करून दिला श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपुर येथे सवंत शके १११५ श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी नक्षत्र अनुरुधा बुधवार रोजी पहाटे प्रातः काळी झाला. त्यांचा बारशाचे दिवशी महानयोगी चौदाशे वर्षाचे चांगदेव महाराज आलेत आणि त्यानीच बाळाचे नावं नरहरी असे ठेवले. वयाचा सातव्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञोपवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला. गहिनीनाथ महाराजांकडुन गुरु उपदेश नाथ संप्रदायाची दिक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला. वयाचा अठरा ते वीस दरम्यान गंगाबाईशी विवाह झाला. साल सुमारे १२७६ असावे आशा त-हेने नरहरी महाराजांचा परमार्थ व प्रपंच सुखा-समाधानाने सुरु झाला.

           सदर या कार्यक्रमा प्रसंगी सुनील सोनार, पंकज सोनार, नयन सोनार, नीतेश सोनार, जगदिश सोनार, आश्विन सोनार, हितेश सोनार, प्रमोद सोनार, अमोल सोनार, मुन्नू सोनार, हेमंत सोनार, तुषार सोनार, नीतेश सोनार, निखिल सोनार, शिवम सोनार, कृष्णा सोनार, प्रितेश सोनार, महिला अध्यक्ष सौ. रेखा सोनार, माजी नगरसेविका कोमल सोनार, तारामती सोनार,प्रणिता सोनार, अंकिता सोनार,भाग्यश्री सोनार, हर्षा सोनार, वृंदा सोनार, निलम सोनार,वर्षा सोनार,कोमल सोनार,वैशाली सोनार, आदींसह सर्व समाज बांधवां, महिला भगिनींनी उपस्थिती लावली होती.