सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क
दि २६ ऑगस्ट
नंदूरबार लोकसभा मतदारसंघात धनदांडग्यांशी लढत देत निवडणूक लढवणार व जिंकणार असा विश्वास डॉ विशाल वळवी यांनी खेडकोचरामाता मंदिर येथे कार्यकर्त्यांचा मेळाव्यात व्यक्त केला.
सन २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील.त्याची पुर्वतयारी म्हणून डॉ विशाल कुवरसिंग वळवी यांनी तयारी सुरू केली आहे.ते भाजपाचे कट्टर समर्थक, गतकाळातील सतत लोकसभा उमेदवार कुवरसिंग फुलजी वळवी यांचे सुपुत्र असुन येत्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करणार असल्याचे सुतोवाच केले आहे.
डॉ विशाल वळवी हे वैद्यकीय क्षेत्रातील उच्चशिक्षित व्यक्तीमत्व आहे.ते आपल्या चाहत्या व मित्र परिवार, समाज, जनसंपर्काच्या बळावर निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.कुवरसिंग वळवी यांच्या संपर्कातील जून्या जाणत्या,आज पक्षाने दुर्लक्ष केलेल्यांचा संपर्क सुरू आहे. लोकसभेची निवडणूक लढविण्याचा दृष्टीने त्यांनी कार्यकर्ते व आप्तेष्ट,मित्रपरिवार यांचा मेळावा खेडकोचरामाता मंदिर प्रांगणात घेऊन मेळाव्यात बोलताना सांगितले की, लोकसभा निवडणूक धनदांडग्यांचा विरोधात लढविणार व जिंकणार असा निर्धार व्यक्त केला.यावेळी खुप मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.