Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार आमशादादा पाडवी यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार मार्फत अक्कलकुवा येथे वाहन चालकांसाठी एक दिवसीय शिबिर संपन्न

अक्कलकुवा दि २९(प्रतिनिधी)
        प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार मार्फत अक्कलकुवा येथे वाहन चालकांसाठी नवीन परवाना, परवानाचे नूतनीकरण आदी कामांसाठी एक दिवसीय शिबिर संपन्न झाले.
        तीन महिन्यांपुर्वी अक्कलकुवा तहसिल कार्यालयात विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी आढावा बैठक घेतली होती त्यावेळी अक्कलकुवा येथे वाहन चालकांना नवीन परवाने मिळावेत यासाठी एक दिवसीय शिबीर घेण्याच्या सुचना  प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या व शिबिर घेण्यासाठी विशेष प्रयत्न व पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत अक्कलकुवा येथे वाहन चालकांसाठी नवीन परवाने, परवान्याचे नुतनीकरण आदी कामांसाठी शासकीय विश्रामगृहात शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते झाले. यावेळी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, उप प्रादेशिक विभागाचे निरीक्षक अविनाश तेलोरे, प्रशांत लोखंडे, शेतकरी सह संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी, 
           कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काना नाईक, तुकाराम वळवी, रविंद्र चौधरी, रोहित चौधरी, हुजेफा बलोच, एडवोकेट रुपसिंग वसावे, गोलू चंदेल, रोहित सोनार आदी उपस्थित होते. यावेळी आमदार आमश्या पाडवी, प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक अविनाश तेलोरे यांनी उपस्थित चालकांना मार्गदर्शन केले. शिबिराचे प्रास्ताविक सुधीरकुमार ब्राम्हणे  यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवा सेनेचे कुणाल जैन यांनी केले.