सुतगिरणी कामगारांचा संप रामभरोसे;आठव्या दिवशीही संप सुरूच!
एमडीने मारली दांडी;कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
शहादा दि २९ (प्रतिनिधी)आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक २२ ऑगस्ट २०२३ पासून सुतगिरणीतील कामगारांनी सुरू केलेला बेमुदत संप आठव्या दिवशीही सुरूच आहे.
पीएफ मिळावा,मागील व या वर्षीचा बोनस मिळावा,पगार वेळेवर मिळावा,इंडेक्स नंबर लावण्यात यावा,ग्रॅज्युएटी मिळावी,दवाखाना सुरू करावा,कॅन्टीन सुरू करावे,महीलांना रात्रीची १२ ते ८ ची ड्यूटी देऊ नका,पतपेढीत व बॅकेत कर्जाचे हप्ते पोहचवा,वर्षाला २५ रजा द्या,पिण्याच्या पाण्याची सोय करा,रिटायर्ड कामगारांना पेन्शन द्या,सुतगिरणीचे झाडे तोडून विकू नका,सुतगिरणीचे सामान भंगारच्या भावाने विकू नका,शेतक-यांचे कापसाचे पैसे द्या,कामगारांचे पैसे द्या इत्यादी मागण्यांसाठी हा संप सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ ता.शहादा गेटसमोर सुरूच आहे.
आज सुतगिरणीचे एमडी राजाराम पाटील सुतगिरणीत आलेच नाहीत.त्यांच्याकडेच आमचे पैसे आहेत.ते आमच्या मागण्यांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.आमच्या मागण्यांकडे कुणीतरी लक्ष देईल व आमच्या समस्या सोडवेल,या आशेवर आम्ही या संपावर बसून आहोत, अशी व्यथा कामगारांनी मांडली.अभी नही तो कभी नही,हम अपना हक मांगते नही किसीसे भिख मांगते,कामगार युनियन जिंदाबाद,हमारी मांगे पूरी करो, कोण म्हणतो देणार नाही,घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशा जोरदार घोषणा कामगारांनी दिल्या.