• आजची गझल • (भाग ५२ )
🌹आघात 🌹
गात्रे शिथील होता जगणेच भार झाले
निष्पाप काळजावर आघात फार झाले
आधार त्या तरुंनी नाकारला खगांना
काट्यावरी लगेचच घरटे तयार झाले
विसरून पार गेले माझ्या समर्पणाला
येता प्रसंग बाका सगळे पसार झाले
काही समर्थकांनी विश्वासघात केला
गट रात्रितून एका पक्षात चार झाले
निर्व्याज प्रेम केले निःस्वार्थ भावनेने
बदल्यात काळजाचे तुकडे हजार झाले
ते धर्मयुद्ध तर मग चुकलेत तर्क कैसै?
निर्दोष पामरे का युद्धात ठार झाले?
होताच 'किरण' कौतुक माझ्या कलागुणांचे
माझ्याच चाहत्यांचे पाठीत वार झाले
शिवाजी साळुंके, 'किरण'
चाळीसगाव
ह. मु. द्वारा, प्रफुल्ल विक्रम साळुंके,
नौदल/वायूसेना हाईट्स, (JVH)
पिन्या, बंगलुरु (कर्नाटक)
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=