Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा अक्कलकुवा रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू , कारचालक पोलिस विरोधात गून्हा दाखल

तळोदा दि २२ (प्रतिनिधी) तळोदा अक्कलकुवा रस्त्यावर गायत्री मिनरल वॉटर जवळ कार अपघातात एकाचा मृत्यू प्रकरणी युवराज चव्हाण नामक तळोदा पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
         घटना घडल्यावर आपल्याच विभागातल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हायला उशीर झाला.यामुळे सुरुवातीपासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद होती.वृत्तपत्रात सत्य छापुन येऊ नये म्हणूनही प्रयत्न झाले.ज्यांनी छापले त्यांना पोलिस अधिकाऱ्यांकडून दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला.तो अधिकारी कोण त्याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घेतली पाहिजे.
        पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि १२ ऑगस्ट रोजी फिर्यादी - देवेंद्र नरेंद्रभाई नेनुजी वय 22 व्यवसाय क्लिनर रा. जामनगर लालपुर रोड दरेड ता. जि. जामनेर ( गुजरात राज्य) यांच्या फिर्यादीवरून 
       आरोपी   फोरव्हीलर गाडी क्र. MH12 KT 4991 काळया रंगाची होन्डा सि टी गाडीवरील आरोपी अज्ञाताविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला.
      या अपघातात दिपकगिरी हिम्मतगिरी गोसाई वय 44 वर्ष रा. रा. जामनगर लालपुर रोड गोकुलधाम सोसायटी प्लॉट नं 235/20 दरेड ता. जि. जामनेर (गुजरात राज्य) याचा मृत्यू झाला.वाहनाचा प्रकार -  फोरव्हीलर गाडी क्र. MH12 KT - 4991 काळया रंगाची होन्डा सि.टी. ट्रक क्रमांक GJ-10 TX-8188 अपघात  दि. 12 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास तळोदा ते अक्कलकुवा रोडावर गायत्री फिल्टर प्लॉन्ट येथुन रस्त्याचे 300 मिटर काही अंतरावर रोडावर सार्व.जागी ही घटना घडली.
       दिपकगिरी हिम्मतगिरी गोसाई यास भरधाव वेगाने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन जोरात चालवुन जोराची ठोस मारुन दुखापत करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला व त्याचे स्वताचे गाडीचे नुकसानीस कारणीभुत झाला म्हणुन गुन्हा दाखल करुन  पोनि  राहुलकुमार पवार यांचे मुखशिल आदेशानुसार गुन्हा रजिस्टरी दाखल करत गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि  अमितकुमार बागुल यांना देण्यात आला आहे.भा.दं.वि. कलम 304 (अ), 279, 337, 338, 427, मो. वा. का. क 134/187, 184 प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे  दाखल अंमलदार- पोहेकॉ  राजधर जगदाळे नेम तळोदा तपासः सपोनि  अमितकुमार बागुल करीत आहेत.
              सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्या सहकारी पोलिसाला वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला असे असले तरी प्रत्यक्ष दर्शनी वाहन अपघातानंतर बायपास वरून त्याला कालिकामातेच्या मंदिरापर्यंत पोचवले होते त्यानंतर या ठिकाणाहूनच संबंधित कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात फोन करून मला वाचवा व तात्काळ गाडी तिथून हलवा असे म्हणून संपर्क केला होता सदर वार्ता ही वाऱ्यासारखी पसरली होती त्यामुळे संबंधिताला वाचवण्याच्या प्रयत्न करणारे अधिकारी देखील कह्यात सापडले होते सदर व्यक्तीच्या मागील व्यवहाराबाबत व वागणुकीबाबत अनेकांना राग धुमसत आहे. त्यामुळे पोलिसांची संशयास्पद भूमिका बघून अनेकांनी सदर गुन्हा संदर्भात वाच्यता करू असे देखील सुचवले होते संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस अधीक्षक यांना याबाबत कळवू असे सांगण्यात आले. पोलीस यंत्रणा शेवटी हतबल दिसून आली व सहकारी असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस त्यांनी दाखवले.याबाबत पोलिसांची विश्वासार्हता वाढेल.
           सदर गुन्ह्याबाबत पोलिसांची संशयास्पद भूमिका असून सदर वाहन तळोद्यातील एका गॅरेज मालकाचा नावे असले तरी सदर वाहन हे तळोदा शहरात ड्युटी बजावून गेलेल्या सध्या अक्कलकुवा येथे कार्यरत असलेल्या युवराज चव्हाण नामक पोलिसाचे असल्याचे सर्वांना माहीत होते त्यामुळे गुन्हा दाखल होताना अज्ञात इसमाचा उल्लेख पोलिसांनी तपास भटकवण्याचा प्रयत्न केला पोलिसांची संशयास्पद भूमिका  असल्याचे सातपुडा मिरर ने म्हटले होते.तरी ही पोलिसांनी काही उपटसुंभांना हाताशी धरून,पी आय चे स्टेटमेंट देत गुन्हेगार अज्ञात असल्याचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यांत हुजरेगिरी करणारे पत्रकार ही उघडे पडले आहेत.