Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा_तालुक्यात_बिबट_मानव_संघर्ष_चिंताजनक - उपवनसंरक्षक यांना उपाययोजनासुचक निवेदन

तळोदा_तालुक्यात_बिबट_मानव_संघर्ष_चिंताजनक - उपवनसंरक्षक यांना उपाययोजनासुचक निवेदन 
तळोदा दि ३०(प्रतिनिधी) मागील अनेक दिवसांपासून तळोदा तालुक्यात "बिबट - मानव संघर्ष चिंताजनक" झाल्याने तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर व नागरिकांना दैनंदिनच बिबटचे दर्शन होत असते तसेच तालुक्यात मागील दिवसांमध्ये बिबटच्या हल्लात पशुधन व एका दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे व या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले आहेत.सामाजिक कार्यकर्ते, तळोदा, शेतकरी, तळोदा तालुका राष्ट्रप्रथम फाँउंडेशन, तळोदा यांचा तर्फे उपवनसंरक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे 
तळोदा तालुका पंचक्रोशीचे अर्थचक्र हे शेतीच्या आधारावर असून बिबट/ वन्यप्राण्यांमुळे शेतीकाम करणे कठीण झाले असून एकीकडे पावसाचा खंड वाढत असल्याने रात्री - अपरात्री शेतीपिकांना वाचविण्यासाठी जीव मुठ्ठीत घेऊन शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. बिबट - मानव संघर्ष कमी व्हायला हवा.
       याबाबत दि.29 रोजी उपवनसंरक्षक,मेवासी वनविभाग कार्यालय, तळोदा यांची भेट घेऊन तळोदा तालुक्यात लवकरात - लवकर बिबट/ वन्यप्राण्यांपासून नागरिकांनी स्वतःची काळजी व संरक्षण कसे करावे यासाठी बिबट सदृश्य गावात जनजागृती, मार्गदर्शन व ठोस उपाययोजना करणेबाबत" निवेदन देण्यात आले. यांत पिंजरे संख्या वाढविणे,गावा – गावांमध्ये मुख्यचौकात माहिती फलक (Banners) व त्यावर चित्रस्वरुपात (Cartoon Photographs) माहिती देणे आवश्यक आहे, कारण चित्र स्वरूप माहितीने अशिक्षित नागरिकांनी कशी काळजी घ्यावी हे लक्षात येईल. जि. प. शाळेतील विध्यार्थ्याना जनजागृतीपर मार्गदर्शन करणे. गावा - गावामध्ये पथनाट्यस्वरुपात मार्गदर्शन करणे. गावा - गावामध्ये विडिओ चित्रफिताद्वारे मार्गदर्शन करणे, वन व्यवस्थापन समितीस आवश्यक ते प्रशिक्षण देणे,.
 चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर “बिबट समस्या मुक्तग्राम” ह्या सारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 
     वन्यजीवांचे जतन व संरक्षण करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य व जबाबदारी आहे.  
तालुक्यातील बिबट - मानव संघर्ष कमी व्हावा यासाठी ठोस उपाययोजना करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे व आपण नागरिक म्हणून शासनास सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे.
 यावेळी अजय रघुवंशी, जगदिश माळी,विराज गुरव,गिरीष कलाल, प्रशांत जावरे,राजेंद्र मोगल, तात्या वैदू, जगन्नाथ राजपूत व आशिष बारी आदी उपस्थित होते.