तळोदा दि १७ (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या आवाहनानुसार अधिकमास अमावास्या समाप्ती व श्रावण महिन्याची सुरुवात या पवित्र दिवशी दि १६ रोजी हातोडा तापेश्वर महदेवाचे दर्शन घेऊन तापी नदीच्या पात्रातुन येथून तीन किलो मीटर अंतरावर नदीवरून कावड कलश यात्रा काढण्यात आली.ग्रामीण भागात ही गावोगावी कावड यात्रा काढून शिवमंदिरात अभिषेक करण्यात आला.
नदीचे पवित्र जल कलश भरून आणण्यासाठी कावड खांद्यावर घेऊन नदी पर्यंत हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले.श्री शिवाय नमःस्तुभ्यम्,बोलो बम का नारा है,बाबा एक सहारा है! चा जयघोषात आसमंत दणाणून गेले.
भाविकांनी आपापली कावड ज्याच्या त्याच्या गल्लीत, परीसरात नेऊन महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक केला.यांत हजारो स्त्रिया,पूरूष,बालक,बालिका सामील झाले होते.
श्री दत्त भजनी मंडळाने तापी नदीपर्यंत भजन संगीतात कावड यात्रा सूरू केली.तापी नदी ते दत्त मंदिर पर्यंत वाजत गाजत कावड आणली.सर्वांनी कावड फुलांचा आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या आवाहनानुसार अधिकमास अमावास्या समाप्ती व श्रावण महिन्याची सुरुवात या पवित्र दिवशी हातोडा गुजरात येथून तीन किलो मीटर अंतरावर तापी नदीवरून कावड कलश यात्रा काढण्यात आली..भाविक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होत्या.माळांनी सजविलेल्या होते.