Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा अक्कलकुवा रस्त्यावर अपघात एक ठार,कार पोलिस चालवत असल्याचे वृत्त, तळोदा पोलिसांचा भुमिकेकडे लक्ष

तळोदा दि १३ (प्रतिनिधी) तळोदा अक्कलकुवा रस्त्यावर गायत्री मिनरल वॉटर जवळ अपघात एकचा मृत्यू तळोदा पोलीसात गून्हा दाखल हि कार एक पोलिस वापरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
        पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी - देवेंद्र नरेंद्रभाई नेनुजी वय 22 व्यवसाय क्लिनर रा. जामनगर लालपुर रोड दरेड ता. जि. जामनेर ( गुजरात राज्य) 
       आरोपी अज्ञात ( फोरव्हीलर गाडी क्र. MH12 KT 4991 काळया रंगाची होन्डा सि टी गाडीवरील आरोपी नाव गाव माहित नाही)
      मयत - दिपकगिरी हिम्मतगिरी गोसाई वय 44 वर्ष रा. रा. जामनगर लालपुर रोड गोकुलधाम सोसायटी प्लॉट नं 235/20 दरेड ता. जि. जामनेर (गुजरात राज्य)
वाहनाचा प्रकार -  फोरव्हीलर गाडी क्र. MH12 KT - 4991 
काळया रंगाची होन्डा सि.टी.
 ट्रक क्रमांक GJ-10 TX-8188
अपघात वेळ व ठिकाण - दि. 12 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास तळोदा ते अक्कलकुवा रोडावर गायत्री फिल्टर प्लॉन्ट येथुन रस्त्याचे 300 मिटर काही अंतरावर रोडावर सार्व.जागी.
      तपशिल - वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपीत मजकुर याने त्याचे ताब्यातील फोरव्हीलर गाडी क्र. MH12 KT - 4991 काळ्या रंगाची होन्डा सि टी ही चुलत भाऊ दिपकगिरी हिम्मतगिरी गोसाई यास भरधाव वेगाने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन जोरात चालवुन जोराची ठोस मारुन दुखापत करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला व त्याचे स्वताचे गाडीचे नुकसानीस कारणीभुत झाला म्हणुन गुन्हा रजी दाखल करुन  पोनि  राहुलकुमार पवार यांचे मुखशिल आदेशानुसार गुन्हा रजिस्टरी दाखल करीत असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि  अमितकुमार बागुल यांना देण्यात आला आहे.भा.दं.वि. कलम 304 (अ), 279, 337, 338, 427, मो. वा. का. क 134/187, 184 प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे  दाखल अंमलदार- पोहेकॉ  राजधर जगदाळे नेम तळोदा तपासः सपोनि  अमितकुमार बागुल करीत आहेत.
          सदर गुन्ह्याबाबत पोलिसांची संशयास्पद भूमिका असून सदर वाहन तळोद्यातील एका गॅरेज चालकाचा नावे असले तरी सदर वाहन हे तळोदा येथुन बदलीने अक्कलकुवा येथे कार्यरत असलेल्या एका पोलिसाचे असल्याचे समजते व रात्री सदर व्यक्ती या वाहनात बसला होता त्यामुळे गुन्हा दाखल होताना अज्ञात इसमाचा उल्लेख असल्याकारणाने पोलिसांची संशयास्पद भूमिका या ठिकाणी दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.