तळोदा दि २१(प्रतिनिधी) तळोदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तालुकाध्यक्षपदी डॉ. पुंडलिक गोविंद राजपूत यांची निवड करण्यात आली.या निवडीने तालुक्याचा राजकारणात दुसऱ्या राष्ट्रवादीचा उदय झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार नंदुरबार येथील पक्षाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्या उपस्थित डॉ. पुंडलिक गोविंद राजपूत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि तळोदा तालुका (अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून याच कार्यक्रमात घोषित करण्यात आले. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदी डॉ पुंडलिक राजपूत यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तालुक्याचा राजकारणात राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरदराव पवार यांचा गट सक्रिय व प्रबळ असताना अजित पवार गटाची नियुक्ती करण्यात आल्याने दोन्ही गटात कार्यकर्ते टिकवण्यासाठी,पक्ष वाढवण्यासाठी कसोटी लागणार आहे.