Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चाळीस लाख,त्र्याऐंशी हजार, तीनशे रूपये किमतीचा तंबाखुजन्य पदार्थाचा माल व मालट्रक वाहन सह मुद्देमाल ताब्यात

शिरपूर दि १९ (प्रतिनिधी). शिरपूर शहर पो.स्टे. चे पोनि आगरकर सो यांना दि. १९/०८/२०२३ रोजी रात्री ०२.३० वाजेचे सुमारास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ ने इंदौरकडून धुळेकडे मालट्रक वाहन क्र. 11. ३२ CGC ६०७५ असे वाहन जात असून त्यात महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंधीत असलेला सुगंधी तम्बाखुजन्य पदार्थाचा माल भरलेला आहे बाबत गोपनीय माहिती मिळाली.
      त्यानुसार पोनि आगरकर यांनी पोहेकॉ / ललीत पाटील यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पाहेको/ललीत पाटील यांनी डी. बी. पथकासह शिरपूर टोल नाक्याच्या पुढे. शिरपूर जि. धुळे येथे पंचांसह सापळा लावला असता राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ने इंदौरकडून धूळेकडे जाणारे मालट्रक वाहन क्र. RJ ३२ GC ६०७५ असे ३.३० वाजेचे सुमारास येतांना दिसल्याने सदर मालट्रक वाहनास शिताफीने पकडून सदर वाहनावरील १) चालक-साजिद समश्या खान वय २६ रा. घुरावली पोस्ट-उत्तवर ता.हथिन जि. पलवल राज्य-हरियाणा तसेच २) क्लिनर मुंताज साहबदिल खान वय २४ रा. घुरावली पोस्ट उत्तावर ता. हथिन जि. पलवल राज्य हरियाणा अशांना सदर वाहनात काय माल भरला आहे बाबत विचारपूस करता त्यांनी तांदुळ व इलेक्ट्रीकचा माल भरला आहे बाबत सांगितले तसेच सदर वाहनातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधी तंबाखुजन्य पदार्थाचा वास येत असल्याने वाहनाचा संशय आल्याने सदर मालट्रक वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता वाहनाचे मागील बाजूस तांदुळ माल, इलेक्ट्रीक. पी. व्हि. सी. वायर, वायडिंग वायर, इलेक्ट्रीक माल, माऊथ फ्रेशनर असा माल भरलेला दिसला तसेच सदर मालाचे आडोशाला सुगंधी तंबाखुजन्य पदार्थाचा माल भरलेले गोणपाट आढळून आले ते खालील प्रमाणे.
       १) २,८०,८००/- रू. कि. ची क्लासीक नावाची सुगंधीत तंबाखु भरलेले एकूण ५२ गोणपाट गोणपाटात असलेले खोके प्रत्येक खोक्यामध्ये ६ प्लॅस्टीक
बॅग प्रत्येकी ५ किग्रॅ वजनाच्या असे एकुण ३१२ प्लॅस्टीक बंग सोनेरी व लाल रंगाच्या त्यावर CLASSIC SKGINET WEIGHT). NEW PACK FOR EXTRA FRESHNESS MANUFACTURING GUDAKU MRP 180 PER KG MFG AUGUST 23 BB JULY 24 COO INDIA असे इंग्रजीत नमुद असलेले
      २) २,४०,०००/- रू. कि. ची नावाची सुगंधीत तंबाखु भरलेले एकुण ४० गोणपाट प्रत्येक गोणपाटात ६० प्लॅस्टीक बंग प्रत्येकी ५०० अं बजनाच्या अस एकुण २४०० प्लॅस्टीक बंग सोनेरी व लाल रंगाच्या त्यावर NEW PACK FOR EXTRA FRESHNESS 500INET WEIGHT) असे इंग्रजीत नमुद असलेले
    ३) ५,६२,५००/- रू. कि. ची पान बहार कंपनीची सुगंधीत सुपारीचा माल भरलेल्या एकुण १० प्लॅस्टीक गोणपाट प्रत्येक गोणपाटात २ गोण्या प्रत्येक गोणीमध्ये ५ प्लॅस्टीक बॅग त्यामध्ये प्रत्येकी २५ पाऊच असे एकुण २५०० पाऊच प्रत्येक पाऊचची किमत २२५/- रूपये प्रमाणे ४) ३०,००,०००/- रु. कि. ची मालट्रक क्र. RJ ३२GC ६०७५ असा असलेली लाल रंगाची जु.वा. कि. अ.
     वरप्रमाणे सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थाचा माल व मालट्रक वाहन क्र. RJ ३२ GC ६०७५ सह एकुण ४०,८३,३००/- रू. कि. चा मुद्देमाल ताब्यात घेवून सदर बाबत निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासन कार्यालय, धुळे यांना पत्रव्यवहार केल्यानुसार अन्न व सुरक्षा अधिकारी श्री. के. एच. बावीस्कर हे शिरपूर शहर पो.स्टे. ला येवून वरील वाहनाची व वाहनातील मालाची तपासणी करून चौकशी अंती सरकारतर्फे फिर्यादी होवुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
        सदर गुन्ह्यात आरोपी नामे १) साजिद समश्या खान वय २६ तसेच २) मुंताज साहबदल खान वय २४ दोन्ही रा. घुरावली पोस्ट उत्तावर ता. हथिन जि. पलवल राज्य हरियाणा अशांना अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.
       सदरची कार्मागरी मा. पोलीस अधिक्षक श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली. श्री. ए. एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. तसेच डी. बी. पथकाचे पोहेकॉ / ललीत पाटील, पोहेकॉ कैलास वाघ, पोना/ रविद्र आखडमल, पोकों/विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंके, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, चापांका/जितेंद्र मालचे तसेच होमगार्ड गोपाल अहिरे, मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी अशांनी मिळून केली आहे.