Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जन्म दिल्याचा हक्क मागते कुठे

• आजची गझल • (भाग ६३ )

🌹जन्म दिल्याचा हक्क मागते कुठे?🌹

विश्वासाचे नाते आता गावते कुठे?
देताना ती मनास धोका सांगते कुठे?

वाटणी अशी झाली जेव्हा आईचीही
जन्म दिल्याचा हक्क तिचाही मागते कुठे?

मला कळाले शब्द कितीदा भावाचेही
बायकोपुढे माझे आता चालते कुठे?

संसाराचे गमक सांगतो बहिणीलाही
सुखात तरिही सासरी अता नांदते कुठे?

स्वप्न सर्वदा मुलात जेव्हा बाप पाहतो
बापासाठी मुलात माया साचते कुठे?

बापाचे ते शब्द मुलीच्या पडता कानी 
येते तेव्हा धावत-धावत थांबते कुठे?

सर्व लेकरे तिला सारखी नित्य जाणते
आयुष्य तिचे स्वत:चे कधी मानते कुठे?

ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव
जळगाव 
मो. 8806544472

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=