Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रिकामे जायचे आहे

• आजची गझल •    (भाग ५८ )

🌹रिकामे जायचे आहे 🌹

पुन्हा स्वप्नात आल्यावर तुला बिलगायचे आहे 
तुझ्या माझ्यातले अंतर मला मिटवायचे आहे 

तुला तर ठेवते प्रेमात माझ्या मुक्त ही थोडे
तुला गमवायचे नाही पुन्हा मिळवायचे आहे

नको लावूस कुठलेही तुझे चुंबक तराजूला
पहा निर्भेळ गरजेला तुला तोलायचे आहे 

नव्याने काळजी दुःखा जरा घेशील येतांना...
सुखालाही घरी माझ्या पुन्हा परतायचे आहे 
   
मलाही चंदनाचा का जरासा वाटतो हेवा
सुगंधास्तव स्वतःलाही अता झिजवायचे आहे 

शिगोशिग घेतली भरुनी पुन्हा माझी रिती ओंंजळ.
जरी ठाऊक होते की रिकामे जायचे आहे 

डॉ शुभांगी कुलकर्णी 
जालना
मो. 84128 71833

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=