सिहौर दि १६ (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या आवाहनानुसार अधिकमास अमावास्या समाप्ती व श्रावण महिन्याची सुरुवात या पवित्र दिवशी सिहौर मध्यप्रदेश येथून दहा किलो मीटर अंतरावर सिवन नदीवरून कावड कलश यात्रा काढण्यात आली.
नदीचे पवित्र जल कलश भरून कुबेरेश्वर धाम सिहौर पर्यंत लाखो भाविक या यात्रेत सहभागी झाले.श्री शिवाय नमःस्तुभ्यम्,बोलो बम का नारा है,बाबा एक सहारा है! चार जयघोषात आसमंत दणाणून गेले.भाविकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा स्वयंस्फूर्तीने पुरविण्यात येत होत्या.