🌹शुष्क पाने जुन्या आठवांची🌹
वाढते रोज संख्या येथल्या खेकड्यांची
पावले खेचणा-या लालची माणसांची
वाहत्या आसवांनी तोडले बांध सारे
पाहिली काल काही वादळे भावनांची
भेटलो एकमेका स्वप्न मी पाहताना वेचली शुष्क पाने मी जुन्या आठवांची
वाटते फार भीती आजही जिंकण्याची
घेतली माणसांनी क्रूरता श्वापदांची
पाहिले मी व्यथेला सोबती वेदनेच्या
वाहते रोज गंगा या इथे आसवांची
लादली मी स्वतःला बंधने कैकवेळा
तोडली एकदाची साखळी संकटांची
मीना शिंदे
वाकड, पुणे
मो. ९८५०९०८९६४
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=