Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिसते वरुन भोळे

• आजची गझल • (भाग ६१ )

🌹दिसते वरून भोळे🌹

दिसते वरून भोळे हे रूप पारध्याचे
टिपतो शरीर एका बाणात सावजाचे

विश्वास ठेवला मी जेव्हा कधी कुणावर
नंतर मला कळाले त्यांनीच फसविल्याचे

विरहात मी सख्याच्या अश्रू किती लपवले
कळले तयास ओघळ दिसताच काजळाचे

साधाच तो दगड पण देवासमान झाला
झाले निमित्त त्याला शेंदूर फासल्याचे

पटले बघून चाळे भलतेच माणसाचे
आहेत गुण अजुनही त्याच्यात माकडाचे

सौ. सुनेत्रा विजय जोशी 
रत्नागिरी
मो. 9860049826

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=