जळगाव :- याचिकाकर्ते परिमल भालकर, रा चाळीसगाव, यांनी महाराष्ट्र शासन व इतर यांच्याविरुद्ध वैद्यकीय उपचाराची खर्चाची प्रतिपूर्ती व वेतन पूर्ववत होऊन स्थगित वेतनाची थकबाकी मिळण्याबाबत तसेच अपघातामुळे आलेल्या शारीरिक अपंगत्वामुळे सेवेत दुय्यम पदावर समाविष्ट करून घेण्याबाबत निवेदन/विनंती अर्जावर निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली होती . थोडक्यात माहिती अशी कि, सुरुवातीला याचिकाकर्ते यांची प्राथमिक शिक्षण सहाय्यक या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सहाय्यक शिक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. सेवेत असताना अपघात झाला. म्हणून याचिकाकर्ते यांनी सदर निवेदन विनंती/ अर्ज सादर केला होता.परंतु संबंधित प्राधिकारी यांनी कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला नव्हता. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी आदेशान्वये प्रतिवादी जिल्हा परिषद, बीड, यांना सदर निवेदन/ अर्जावर सहा महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे निर्देशित केले आहेत. याचिकाकर्ते तर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (9518323726) यांनी काम पाहिले.
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद : वैद्यकीय खर्च - थकबाकी व नियुक्ती प्रकरण लवकर निर्णय घेण्याचे निर्देश
August 25, 2023
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद : वैद्यकीय खर्च - थकबाकी व नियुक्ती प्रकरण लवकर निर्णय घेण्याचे निर्देश