शहादा दि२५ (प्रतिनिधी) मलगाव खुनाच्या गंभीर गुन्ह्य़ात आरोपीत सुनिल राजेंद्र पावरा, गणेश दिवान खर्डे, , अरुन राजेंद्र पावरा ,व तीन महीला यांना जामीन मंजूर करू नका,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शहाद्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शेतीच्या वादातून मलगांव ता.शहादा जि.नंदुरबार येथे अविनाश सुखराम खर्डे( मुलगा) व सुखराम कलजा खर्डे (वडील )यांना गावठी गट्ट्याने- बंदूकीने गोळ्या झाडून ठार मारण्यात आले.या घटनेबाबत पोलीस ठाणे शहादा येथे दिनांक २७/०७/२०२३ रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीत सुनिल राजेंद्र पावरा,गणेश दिवान खर्डे, ,अरून राजेंद्र पावरा,,व तीन महिला यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०२,३०७,४४७,१४३,१४७,१४८,१४९,३,,२५,४,३१(१),३७(३),१३५ अन्वये खुनाच्या गंभीर गुन्ह्य़ात अटक करण्यात आली आहे.सदर आरोपीत जामीन मिळावा,म्हणून विविध कारणे दाखवून कारागृहाबाहेर सुटण्याचा प्रयत्न करत आहेत.
खुनाच्या गंभीर गुन्ह्य़ात अटक झालेल्या आरोपीतांना जामीन मंजूर झाल्यास पुन्हा या आरोपीतांकडून खुनाचे दुष्कृत्य घडून मयतच्या नातेवाईकांस तसेच समाजातील इतर व्यक्तींच्या जीवितास धोका उद्धभवू शकतो.तसेच कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गावातील वातावरण बिघडू शकते. आरोपीतास कायद्यानुसार फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे.तरी वरील खुनाच्या गंभीर गुन्ह्य़ात अटक असणा-या आरोपीतांना कुठल्याही परिस्थितीत जामीन मंजूर होवू नये,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य सदस्य अशोक वळवी ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, सदस्य निकेश पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.