देशात - राज्यात काहीही घडो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदूरबार जिल्हा सर्व पदाधिकारी,महाराष्ट्राचा जाणता राजा शरदराव पवार यांच्या पाठीशी असुन एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र खा सुप्रिया सुळे यांच्या सुपुर्द केले.
दिनांक 15 ऑगस्ट रोजी मुंबई YB सेंटर येथे लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या वरील निष्ठा व दृढ विश्वास प्रमाणित करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या समवेत नंदुरबार,
नवापूर,अक्कलकुवा,धडगाव, शहादा,तळोदा अश्या सहा तालुक्यातून NCP राष्ट्रीय कार्यअध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना मुंबई येथे भेटुन प्रतिज्ञापत्र सुपूर्त करण्यात आले ह्या प्रसंगी कृ.उ.बा.स.उपसभापती हितेंद्र क्षत्रिय,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोदा तालुका अध्यक्ष संदीप परदेशी,राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे,शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी उपस्थित होते.