सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क दि २९
यंदाचा 'जयपाल-ज्युलियस-हन्ना साहित्य पुरस्कार' अरुणाचल, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील तीन तरुण लेखकांना जाहिर झाला आहे. नोव्हेंबर मध्ये रांची (झारखण्ड) येथे हा राष्ट्रीय साहित्य अवार्ड दिला जाणार आहे.
त्यात महाराष्ट्रातातून नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी युवा कवि संतोष पावरा यांच्या आदिवासी *पावरा/बारेला मातृ भाषेतून हिंदी अनुवाद सह हेम्टू (अतिक्रमण)कविता संग्रहाला* राष्ट्रीय जयपाल-जुलियस-हन्ना अवार्ड जाहिर झाला आहे. हा अवार्ड रांची येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या कविता संग्रहास हा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्यारा केरकेट्टा फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी व प्रख्यात आदिवासी लेखिका वंदना टेटे यांनी नुकतेच रांची येथे ही घोषणा केली. गेल्या वर्षी जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थापन करण्यात आलेला जयपाल-ज्युलियस-हन्ना साहित्य पुरस्कार हा भारतातील कोणत्याही आदिवासी भाषेत लिहिलेल्या तीन मूळ कलाकृतींना दिला जातो.
प्यारा केरकेट्टा फाउंडेशनच्या वंदना टेटे यांनी सांगितले की, या पुरस्कारासाठी अनेक प्रवेशिका होत्या, त्यापैकी ज्युरींनी महाराष्ट्रातून कवि संतोष पावरा यांच्या 'हेम्टू' (अतिक्रमण) आणि पश्चिम बंगाल येथील डॉ. पूजा प्रभा एक्का यांची निवड केली. तर अरुणाचल प्रदेश येथील डॉ. तूनुड ताबिड यांच्या कविता संग्रहास यंदाचा हा अवार्ड जाहिर झाला आहे.
श्रीमती टेटे म्हणाल्या की, या तिन्ही रचना भारतातील आदिवासी समाजाची अभिव्यक्ती मोठ्या कलात्मकतेने आणि सौंदर्याने मांडल्या आहेत हे आशादायक भविष्यातील आदिवासी रचानाकार आहेत. ज्यांच्या कृतींमधून तरुण आदिवासी लेखकांना प्रोत्साहन मिळेल. त्यांच्या भाषेबद्दल आणि साहित्याबद्दल असलेले अथांग प्रेम, निसर्ग जतन संवर्धनाचे दृष्टिकोन व आदिवासी साहित्य संस्कृती इतिहास चळवळी बद्दलचा विचार त्यांचा साहित्यातून दिसून येते.
संतोष पावरा हा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील लक्कडकोट गावचे अल्प भूधारक शेतकरी कुटुंबातून असून पावरा /बारेला , भील आदिवासी समाजाचा युवा लेखक आहेत. आदिवासी एकता परीषद व विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते आहेत. हेम्टू (अतिक्रमण) हे त्यांचे दुसरे कविता संग्रह आहे. संतोष पावरा ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांच्या सोबत आदिवासी साहित्य व चळवळीच्या कामात भारतातील विविध राज्यात सतत प्रवास करीत असतात. पावरा हे नुकतेच भोपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात सहभागी होऊन पावरी व भीलोरी बोलीतील साहित्याचे नेतृत्व केले होते.