Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रांझणी गावात बिबटचा एकवर हल्ला, परीसरात भितीचे वातावरण

तळोदा दि १९(प्रतिनिधी)तालुक्यातील रांझणी गावात रात्रीच्या सुमारास बिबटने हल्ला चढवत एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जगदीश हिरालाल पाडवी हा घरात झोपला होता बिबटने  झोपडी कुडावर बसलेल्या कोंबड्यांवर हल्ला केला त्या एक कोंबडी फस्त केली कोंबड्याच्या आवाज आल्याने जगदीश उठून पहिले बिबटने त्यावर हल्ला केला त्यात डाव्या हातावर पंज्या ने नख्यानी जखम झाली आहे जगदीश ला उपजिल्हारुग्णालयात औषध उपचार केला वनविभागाचे अधीकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली गावात बिबट शिरत हल्ला करीत आहे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे बिबटचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे

             रांझणी येथे  जगदीश हिरालाल पाडवी जखमी झाले होते. एक कोंबडी फस्त केली होती. शुक्रवारी सायंकाळी अगदी गावालगतच्या गोपाळपूर रस्त्यावरील रांझणीचे प्रवीण कदम यांच्या कापसाच्या शेतात बिबट मुक्त संचार करतांना  रमाकांत गोसावी यांना दिसला त्यांनी बिबटला मोबाईल कॉमेऱ्यात मुक्त संचारचे दृश्य कैद केले आहे. आता गावात बिबट शिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने बिबटला पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.