• आजची गझल • (भाग ५९ )
🌹पहारे🌹
लागलेले आपल्या मागे युगांचे हेच वारे
वाटते वाईट का रे सोडतांना हे किनारे
तू जमवले भोवताली मात्र कच-याचे ढिगारे
शेवटी सोडून गेला मोल नसलेले पसारे
डाव माझा पूर्ण झाला फक्त करतो मी उजळणी
पाहुनी आम्हा जनांना लोक का म्हणती बिचारे
रास नोटांची कशाला लावतो खात्यात तूही
मोजके तू ठेव पाशी, फेक सत्वर ते निखारे
का कचरतो मानण्याला सत्य मृत्यूचे खरे
तो चुकवतो नेमके जे लावलेले तू पहारे
प्रकाश पटवर्धन
मुलुंड(पू)
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=