महिलेशी अरेरावीची भाषा वापरणा-या तहसील कार्यालयातील अव्वल कारकून विरोधात जिल्हाधिकारींकडे तक्रार कारवाईची मागणी
August 24, 2023
तळोदा दि २५(प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयात रुकसाना बी फारूक अली सय्यद ही महिला त्याची मुलगी सोबत राजपत्र कामी प्रतिज्ञापत्र वर सही घेण्यासाठी गेले असता तीस अपशब्द वापरून प्रतिज्ञापत्र वर सही केली नाही. त्या महिलेस हाकलून लावले. या सदर महिलेने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना तक्रारी अर्ज दिला असून तक्रारीत नमूद केले आहे की, माझी मुलगी हिच्या विवाह दिनांक २६/०२/२०२३ रोजी लग्न पारोळा जिल्हा जळगाव येथील कलीम शेख यांच्यासोबत तळोदा येथे संपन्न झाला, माझी मुलीचे सर्व कागदपत्रे आधार कार्ड, रेशन कार्ड व इत्यादी तळोदा तहसील चे असून माझ्या मुलीचे सर्व कागदपत्रे पारोळा येथे व्हावे यासाठी मी व माझी मुलगी राजपत्र चे प्रतिज्ञापत्रावर सही घेण्या साठी गेले असता तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून प्रमोद बाळकृष्ण अमृतकर यांच्याकडे दिनांक १८ रोजी दुपारी चार वाजता गेली असता अहवाल कारकून श्री अमृतकर यांनी माझ्या प्रतिज्ञापत्रावर सही न करता व मला अपशब्द वापरून हाकलून लावले तुम्ही पारोळा तहसील कार्यालयात जाऊन सही करा. त्यानंतर मी परत २१ रोजी अव्वल कारकून प्रमोद बाळकृष्ण अमृतकर यांच्या कडे विनंती केली, तरी त्यांनी सही देण्यास स्पष्ट नकार दिला सर्वात आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे तळोदा तहसील कार्यालयातील सर्व शाखेचे अव्वल कारकून यांना प्रतिज्ञापत्र वर सही देण्यासाठी मनाई केली, मी एक महिला असून एवढा द्वेष बुद्धी वागणे योग्य आहे का ? सदर माझी मुलीचे सर्व कागदपत्रे तळोदाचे असून सुद्धा प्रतिज्ञा पत्रावर सही का केली नाही ? एवढा बुद्धीपुरस्कार त्रास का ? अमृतकर यांच्याकडून असे भेदभाव का ? या मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी असे तक्रारी अर्ज मध्ये नमूद केलेले आहे.