• आजची गझल • (भाग ४७ )
ओरडतो जो घसा फोडुनी माती विकतो येथे
सोने असुनी घुमा बिचारा तरसत बसतो येथे
देखाव्याला भुलते दुनिया न्याय खऱ्याला नाही
एक तपस्वी सत्यासाठी नाहक झुरतो येथे
ओझे झाले पापाचे पण चालत आहे जग हे
साधक कोणी माणुसकीची ओंजळ जपतो येथे
कुणी कुपोषित, अन्नासाठी दाहिदिशांना फिरतो
अंधभक्त तो दुध शिळेवर रोज ओततो येथे
जीव मारले कित्येक वेळा झाड लावले नाही
भिंत सजवण्या हिरवळ भरले चित्र शोधतो येथे
किरण देशमाने
धाराशिव (उस्मानाबाद)
मो. 9422465721
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=