Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोकण मराठी साहित्य परिषद उल्हासनगर शाखेच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक व कवी डॉ.प्रा.प्रकाश माळी तर कार्यवाहपदी जेष्ठ कवी एम.आर.निकम

उल्हाहनगर दि २४ (प्रतिनिधी) कोकण मराठी साहित्य परिषद उल्हासनगर शाखेच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक व कवी डॉ.प्रा.प्रकाश माळी तर कार्यवाहपदी जेष्ठ कवी एम.आर.निकम यांची निवड करण्यात आली आहे 
         कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उल्हासनगर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सुयश क्लासेस,उल्हासनगर-४ येथे सुनिल बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सदर सभेत खालील कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. येणेप्रमाणे 
अध्यक्ष  डॉ.प्रा.प्रकाश माळी
उपाध्यक्ष सुनिल बडगुजर
उपाध्यक्ष श्रीमती वैभवी चव्हाण
कार्याध्यक्ष सौ.प्रिया मयेकर
कार्यवाह एम.आर.निकम
सहकार्यवाह सौ.माधुरी फालक
कोषाध्यक्ष  डॉ.अनिल पावशे
  कार्यकारिणी सदस्य डॉ.नरसिंग इंगळे,नागेश गाढे,अनंत विचारे,
 सौ.सुमन नेमाडे,किशोर देसले
 सौ.जयश्री देशमुख,राजेश साबळे
 श्रीमती स्मिता बद्रिगे यांची निवड करण्यात आली.