सुतगिरणी बंद, सुतगिरणी प्रशासनाविरोधात कामगारांचा संप व कामबंद आंदोलन!
६ वर्षांचा पीएफ मिळावा, बोनस, दवाखाना, कॅन्टीन व पिण्याच्या पाण्याची मागणीसह इतर मागण्या
शहादा दि २२(प्रतिनिधी) ऐकेकाळी जगभरात नावाजलेली लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ ता.शहादा जि.नंदूरबार येथील सुतगिरणीला आता ग्रहण लागले आहे.सुतगिरणी बंद अवस्थेत आहे.गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुतगिरणीतील कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे,संप पुकारला आहे.गेल्या ५-६ वर्षांपासून आपला पीएफ विद्यमान मॅनेजर (एमडी) राजाराम दुल्लभ पाटील हे देत नाहीत,आमच्या पगारातील १० टक्के रक्कम आमच्या खात्यावर जमा केली जात नाही,आम्हाला पीएफच्या माध्यमातून ती रक्कम देत नाहीत,असा आरोप सुतगिरणीतील कामगारांनी केला आहे.
सन २०१७ पासून आजपर्यंत थकित असलेला ५-६ वर्षांचा पिएफ आम्हाला मिळावा,मागील वर्षांचा व या वर्षीचा बोनस मिळावा,पगार वेळेवर मिळत नाही,दवाखाना बंद आहे तो सुरू करावा,कॅन्टीन बंद आहे ते सुरू करावे,पिण्याच्या पाण्याची सोय करावी,रुग्णांना अन्य दवाखान्यात न्यायला वाहन नाही,कामगारांवर दबाव टाकला जातो व कामावरून काढून टाकण्यात येते,पगार कमी केला जातो,गेल्या १२वर्षापासून ग्रज्यूईटी मिळत नाही,रिटायर्ड कामगारांना ग्रॅज्यूइटी परत करावी लागते,काही कामगारांना पेन्शन मिळते तर काही कामगारांना पेन्शन मिळत नाही,पीएफसाठी फार्म भरण्यासाठी एजेंटकडे पाठविण्यात येते,सुतगिरणीतील अधिकारी व कर्मचारी त्यासाठी मदत करत नाहीत, फार्म भरण्यासाठी एजेंट ४००० रूपये उकळतात, कायम कामगार आजारपणामुळे उपचारासाठी ६ महिने घरी राहिल्यावर त्यांचा रोजचा पगार ५५० वरून ३५० रूपये करण्यात येतो.इंडेक्स वाढल्यानंतर सुद्धा कामगारांचा पगार वाढवला जात नाही,वर्षातून २५ दिवस मिळणा-या हक्काच्या रजा दिल्या जात नाहीत,१८ वर्षे सेवा करूनही होरीलाल बिंद यांचा राजीनामा स्वीकारला जात नाही,पदोन्नती देताना मनमानी कारभार करून सिनीयरला डावलले जाते ज्युनिअरला पदावर ठेवले जाते,तुंबा रोहीदास पाटील यांनी पतपेढीत कर्ज घेतल्यावर सुतगिरणीत पगारातून कपात झालेला हप्ता पतपेढीत पोहचवला जात नाही,अशा अनेक समस्या सुतगिरणीतील कामगारांनी मांडल्या आहेत.या सगळ्या समस्यांना सूतगिरणीचे मॅनेजर राजाराम पाटील हे सर्वस्वी जबाबदार असून त्यांना तात्काळ पदावरून हटवा,अशी मागणी कामगार करीत आहेत.सुतगिरणीचे पूर्वीचे मालक दिपक पाटील हे सुद्धा पीएफ २-३ महिन्यांत टाकतो,अशी आमची दिशाभूल करून फसवणूक करतात.आपल्या मागणीचे निवेदन सुतगिरणी प्रशासनाला देण्यात आले आहे.
हमारी मांगे पूरी करो; नही तो खुर्ची खाली करो, कामगार युनियन जिंदाबाद, सुतगिरणी प्रशासन मूर्दाबाद, आम्हाला हक्क मिळालाच पाहिजे,हम सब एक है,हम अपना हक मांगते नही किसीसे भीख मांगते!अशा जोरदार घोषणा कामगारांनी दिल्या.यावेळी शहादा तालुका सुतगिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष जगन निकुम, उपाध्यक्ष रामदास पाटील, सेक्रेटरी गजानन पाटील, खजिनदार दत्तू भील,सदस्य दिलीप सोनवणे,युवराज पाटील,महेंद्र पाटील, अशोक मराठे,जितेंद्र पाटील सह हजारों कामगार उपस्थित होते.