मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद : अनुकंपा तत्वावर नियुक्ती प्रकरण : लवकरात लवकर निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश
August 22, 2023
धुळे :- मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद : अनुकंपा तत्वावर नियुक्ती प्रकरण : लवकरात लवकर निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश : याचिकाकर्ते कलावती पाटील, रा ता धडगाव, हिने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे, यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. थोडक्यात माहिती अशी की, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे, यांनी याचिकाकर्ते हिच्या पतीला जिल्हा परिषद शाळा, तालुका धडगाव, येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर सेवेत असताना कालवश झाले होते. याचिकाकर्ते तसेच तिच्या मुलाने सदर अर्जावर निर्णय घेण्यासाठी संबंधित प्राधिकारीचा वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तरी देखील संबंधित प्राधिकारी यांनी कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला नव्हता. म्हणून याचिकाकर्ते हिने सदर अर्जावर निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे एडवोकेट गजेंद्र देवीचंद जैन (भंसाली) यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी आदेशान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे, यांना सदर अर्जावर गुणवत्तेनुसार तसेच कायदा व धोरणे नुसार लवकरात लवकर तीन महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले. याचिकाकर्तेतर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (9518323726) यांनी काम पाहिले.