Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुतगिरणी कामगारांचा दुसर्‍या दिवशीही संप सुरूच;उद्या मोर्चा काढण्याचा दिला इशारा

सुतगिरणी कामगारांचा दुसर्‍या दिवशीही संप सुरूच;उद्या मोर्चा काढण्याचा दिला इशारा

शहादा दि २३ (प्रतिनिधी) लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ ता.शहादा जि.नंदूरबार येथील सुतगिरणीतील कामगारांनी दिनांक २२ ऑगस्टला सुरू केलेला संप आज दुसर्‍या दिवशीही सुरूच आहे.रात्रीसुद्धा सुतगिरणी गेटसमोर कामगार संपावर ठाम बसून होते.संपात बहुसंख्येने कामगार सहभागी झाले असून महिलाही शामिल झाल्या.आम्हाला रात्रीची १२ ते ८ अशी ड्यूटी जबरदस्तीने लावण्यात येते.कामगार कायद्यानुसार महिलांना कुठलीच सुविधा दिली जात नाही.कंत्राटदार अजय गोयल व निखिल गोयल हे पीएफ देतो व पगार वेळेवर देतो असे खोटे बोलून आमची फसवणूक करतात.अशा व्यथा महिला कामगारांनी मांडल्या. यावेळी नितेशबेन पाटील, वसंतीबाई पावरा,मिना कुंवर, कान्हुपात्रा सरवदे, रेखाबाई कुवर,जिजाबाई पाटील, वन्ती पावरा,सुनिता जयस्वाल, मंगलाबाई वसावे,प्रमिलाबाई गावित, गिताबाई जयस्वाल, मनिषाबाई पटेल आदि महिला उपस्थित होत्या.

                ५-६ वर्षांचा पिएफ आम्हाला मिळावा,मागील वर्षांचा व या वर्षीचा बोनस मिळावा,पगार वेळेवर मिळत नाही,दवाखाना बंद आहे ,कॅन्टीन बंद आहे,पिण्याच्या पाण्याची सोय नाही,आमच्याकडून प्रत्येकी १०० रूपये पाण्यासाठी मागतात, रुग्णांना अन्य दवाखान्यात न्यायला वाहन नाही,महिलांसाठी वाहन नाही,जो बोलतो त्या कामगारांवर दबाव टाकला जातो कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते,पगार कमी केला जातो,रजा दिली जात नाही,सुतगिरणीचे पूर्वीचे मालक दिपक पाटील हे सुद्धा पीएफ २-३ महिन्यांत टाकतो, असे सांगू आमची दिशाभूल करून फसवणूक करतात.सुतगिरणीचे एमडी राजाराम दुल्लभ पाटील,उपकार्यकारी संचालक उत्तम संभू पाटील, मॅनेजर व कंत्राटदार अजय गोयल व निखिल गोयल हे सुतगिरणीचे पैसे आले की येथे येतात व पैसे गेले की तेसुद्धा निघून जातात. सुतगिरणीतील कामगारांचा कुणी वाली नाही,मालक नाही,कुणीही आमच्याकडे लक्ष देत नाहीत,कामगारांचा संप बघून सुतगिरणीचे एमडी,मॅनेजर, उप कार्यकारी संचालक व कंत्राटदार गायब झाले आहेत,अशी संतप्त प्रतिक्रिया कामगारांनी दिली आहे.

                 हम अपना हक मांगते; नही किसीसे भीख मांगते,कामगार युनियन जिंदाबाद;सुतगिरणी प्रशासन मूर्दाबाद, आम्हाला हक्क मिळालाच पाहिजे,हम सब एक है,लढेंगे ;जितेंगे!अशा जोरदार घोषणा कामगारांनी दिल्या.यावेळी शहादा तालुका सुतगिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष जगन निकुम, खजिनदार दत्तू भील,सदस्य दिलीप सोनवणे,कामगार काशीनाथ पाटील, मनोहर माळी,विजय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.या संपात पुरूष महिलांसह हजारों कामगार उपस्थित होते.आमच्या संपाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केल्यास आम्ही उद्या शहादा तहसीलदार कार्यालयासमोर लोणखेडा-मलोणी- शहादा बाजार मार्गे मोर्चा नेणार आहोत,असा इशारा कामगारांनी दिला आहे.