Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार आमशा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नव निर्वाचित कार्यकारिणी जाहीर

तळोदा दि १९(प्रतिनिधी )
 शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तळोदा तालुक्याची नव निर्वाचित कार्यकारिणी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली घोषित करण्यात आली आहे.
        तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नुतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे त्यात दोन तालुका उप प्रमुख, एक तालुका संघटक, तीन विभाग प्रमुख, पाच उप विभाग प्रमुख अशी कार्यकरिणीची रचना करण्यात आली आहे. त्यात तालुका उप प्रमुख पदी रतीलाल सुपड्या वळवी, काशिनाथ नटवर कोळी, तालुका संघटक पदी कृष्णा भगवान पाडवी, विभाग प्रमुख राजु सुरसिंग पवार, दशरथ श्रावण बारीकराव, सचिन दशरथ ठाकरे, उप विभाग प्रमुख पदी दिलीप शामा पाडवी, कौश्या येड्या ठाकरे, नटवर सुनेसिंग ठाकरे, राजु सुरेश ठाकरे, सुरेंद्र बुलेसिंग वळवी आदींची निवड करण्यात आली असुन ती जाहीर करण्यात आली आहे. या निवडी बद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी,नंदुरबार संपर्क प्रमुख माजी आमदार प्रा.शरद पाटील,जिल्हा प्रमुख गणेश पराडके, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, प्रविण वळवी यांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.