Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदूरबारच्या चिमुकलीशी पंतप्रधान मोदींनी जोहान्सबर्ग येथे साधला संवाद

पंतप्रधान मोदींनी जोहान्सबर्ग येथे साधला भारतीय नंदुरबारच्या चिमुकलीशी संवाद

नंदुरबार (प्रतिनिधी) महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जोहान्सबर्ग दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोहान्सबर्ग येथे शब्दुली जोशी या भारतीय चिमुकलीशी संवाद साधला.विशेष म्हणजे शब्दुली जोशी मूळची नंदुरबारची असून तिच्या भावनिक संवादांनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारावले.
नंदुरबार येथील सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठविधीज्ञ अँड कालिदास पाठक आणि गृहिणी सौ. सुनंदा पाठक दाम्पत्यांची सुकन्या सौ. पूर्वाताई जोशी आणि जावई अभियंता प्रशांत जोशी सध्या जोहान्सबर्ग येथे वास्तव्यास आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जोहान्सबर्ग दौऱ्यावर असतांना योगायोगाने जोशी परिवाराची भेट झाली. या अनोख्या आणि सहृदयी भेटीप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमुकली शब्दुली जोशी हिच्याशी भावनिक संवाद साधला.भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करून हिंदुस्तानचे नाव रोशन करण्याचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्दुली जोशीला दिला. भारतीय वंशाची शब्दुली जोशी या चिमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधलेल्या संवादाचे सर्वत्र कौतुक होत आहे.