जालना दि १३ (प्रतिनिधी). शौर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीने मुंबई येथे स्वातंत्रदिना निमित्ताने पुर्वसंध्येआधी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप व बिस्किटचा खाऊ वाटप करण्यात आला.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस दोन दिवसांवर असताना विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण करण्यासिठी व शिक्षणाचे महत्त्व बिंबवण्यासाठी, सामाजिक उपक्रमात सदैव तत्पर असणा-या , ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी, बरोबरच शैक्षणिक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आवड निर्माण व्हावी म्हणून शौर्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष किरण साळवे
शिक्षा फांडेशन अध्यक्ष वघेला मॅडम
मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करून शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटत करत विद्यार्थ्यांत आनंददायी वातावरण निर्माण करत शिक्षणाची गोडी निर्माण केली.सर्वत्र संस्थेच्या या उपक्रमाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.