Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्व गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे विधिमंडळातले चालते बोलते विद्यापीठ!- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर.दि १४(प्रतिनिधी)
स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांचे पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळा संपन्न झाला.स्व. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे विधिमंडळातले चालते बोलते विद्यापीठ!- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
         सांगोला येथे स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण केले. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार ,  श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख , विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर , खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , खासदार संजय काका पाटील, आमदार जयंत पाटील,  आमदार शहाजी पाटील, आमदार समाधान अवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार राजेंद्र राऊत, आमदार यशवंत माने, आमदार राम शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक,  माजी आमदार महादेव जानकर, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, सूतगिरणीचे संचालक, शिक्षण संस्थेचे संचालक, बाबासाहेब देशमुख आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
       स्व. गणपतराव देशमुख जी यांनी शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांच्या प्रश्नांसाठी आपले आयुष्य झोकून दिले. सामन्याच्या उत्थानासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आबासाहेब अग्रेसर होते.
       परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, मात्र राजकारणातील शाश्वत सत्य हे गणपतराव जी देशमुख होते. आबासाहेब यांनी परिवर्तनाचे सर्व नियम बाजूला ठेवून एकाच विचाराने काम केले. मंत्री पद गेल्यावर शासकीय वाहन सोडून एसटीने जाणारे नेते म्हणजे आबासाहेब !
       विरोधी पक्षात असताना आम्ही एकलव्य म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडून खूप शिकलो. विदर्भाचे सिंचन आणि राज्यातील दुष्काळी भागाचे दुःख एकच आहे, असे ते म्हणायचे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागांचे आणि सिंचनाचे प्रश्न, समस्या आणि समाधान हे त्यांच्याकडून शिकता आले.
       लोकांच्या व्यथा आबासाहेब सभागृहात मांडायचे. एकही दिवस सुट्टी न घेणारे आमदार ते होते. सभागृह सुरू व्हायच्या आधी प्रथम येणारे आणि सभागृह संपल्यावर शेवटी जाणारे म्हणजे आबासाहेब !. कुठल्याही विधेयकावर आबासाहेब बोलायचे. आबासाहेब हे वन मॅन आर्मी होते. सभागृहात गोंधळ असला की, अध्यक्ष आबासाहेब यांना संधी द्यायचे, त्यावेळी सभागृह शांत व्हायचे. राज्याच्या विधीमंडळाची उंची आबासाहेब यांच्यासारख्या विचारवंतांमुळे वाढली.
    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,2003 साली माझ्या मतदार संघातील प्रश्न विधानसभेत मांडला. त्यावेळी माझ्या मतदार संघात एक विनंती समिती आली. त्यात आबासाहेबही होते. विधानसभेच्या या समितीवरून माझ्या मतदार संघात गोंधळ होता.
पण विधान सभेच्या समितीला कोणीही अडवू शकत नाही, असे पोलिसांना सांगणारे नेते आबासाहेब होते. त्यावेळी मला गाडीत घेऊन माझ्या मतदार संघात आबासाहेब फिरले.
        विरोधात असतानाही खुल्या मनाने सरकारचे अभिनंदन करणारे आबासाहेब होते. कापूस क्षेत्रातील सूतगिरण्या बंद पडल्या. मात्र सांगोल्याची सूतगिरणी आबासाहेब यांच्यामुळे चांगली सुरू आहे.
           विधीमंडळाच्या भौगोलिक रचने नुसार आबासाहेब यांचे स्मारक सर्वांना दिसेल असे करणार. आबासाहेब यांचे स्मारक करण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या अध्यक्ष व जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच विधानभवनात स्मारक होणार. आबासाहेब यांच्या स्वप्नातील राहिलेल्या गोष्टी आपणास पूर्ण करण्याची ताकद आम्हाला मिळो.