Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छायाचित्रकारांशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होत नाही - माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

छायाचित्रकारांशिवाय कुठलेही कार्य पूर्ण होत नाही - माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार दि २४ (प्रतिनिधी) लग्नकार्य, वाढदिवस असो की राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कुठलेही कार्य छायाचित्रकारांशिवाय पूर्ण होत नाही. व्यावसायिक असोत की प्रसारमाध्यम क्षेत्रातील छायाचित्रकार समाजाचा प्रमुख आरसा आहेत. प्रत्येकाचे हास्य टिपणारे छायाचित्रकार मात्र मोबाईल क्रांतीमुळे जीवनात संघर्ष करीत असल्याची खंत माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली.
नंदुरबार जिल्हा व्यावसायिक फोटोग्राफर असोसिएशन आणि नंदुरबार जिल्हा प्रेस फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दंडपाणेश्वर गणपती मंदिर संस्थानच्या सभागृहात शनिवार दि. 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजितक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हाईस चेअरमन तथा उद्योजक मनोज रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस फोटोग्राफर संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांनी केले.सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख महादू हिरणवाळे यांनी केले.नंदुरबार जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे माजी अध्यक्ष भूषण पाठक यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन माजी अध्यक्ष राकेश तांबोळी, राजेंद्र पाटील, सागर बारी, प्रफुल निकुंभ, सुनील कुलकर्णी, सूर्यकांत खैरनार, वैभव थोरात, संदीप महाजन, गणेश पारेख, अजय बडगुजर आणि पदाधिकाऱ्यांनी केले.