Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उपप्रादेशिक परिवहन तर्फे २०० वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी



वाहन चालकांचे आरोग्य महत्त्वाचे - अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे
रस्ता सुरक्षा अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन तर्फे २०० वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी 
नंदुरबार दि २५ (प्रतिनिधी) रात्रं दिवस वाहन चालवणारे सर्वच वाहन चालकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. विशेषतः
नेत्राची काळजी घेणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन विभागाने सर्वच वाहन चालकांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून सामाजिक उपक्रम राबविला असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले.
         उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नगर पालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात गुरुवारी
आरोग्य तपासणी शिबिर झाले. यावेळी निलेश तांबे बोलत होते. व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर,शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर ,वाहतूक पोलीस निरीक्षक भरत जाधव,उपस्थित होते. शिबिराचा उद्देश आणि प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले.
वाहन चालकांचीआरोग्य तपासणी वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्रा. डॉ. हरिश्चंद्र गावित डॉ. अमोल किनगे,डॉ. शिरीष परांडे,नेत्रतज्ञ डॉ.अक्षय भावसारआणि त्यांच्या पथकाने संयोजन केले.
           कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहायक मोटर वाहन निरीक्षक निलेश पाटील यांनी केले. तर सहाय्यक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी आभार मानले. तपासणी शिबिरात सुमारे 200 वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली.आवश्यक चालकांना मान्यवरांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले. या तपासणी शिबिरात रिक्षा, टॅक्सी, ट्रक तसेच एसटीतील सेवानिवृत्त चालकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
                   शिबिर यशस्वीतेसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक तेजस देशमुख, प्रितेश भावसार, बाबासाहेब गायकवाड,दीपक राजपूत, रोहन गिरासे व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.