Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ह्रदय विरघळायचे आहे

आजची गझल •    (भाग ५६ )

हृदय विरघळायचे आहे

जरा जरासे तुला प्रेम व्हायचे आहे
हळू हळू हे हृदय विरघळायचे आहे

हव्या कशाला तुला कालच्या उद्या चिंता
झुल्या झुल्यांनी इथे जर झुलायचे आहे

घडून गेल्या जरी लाखदा चुका माझ्या
स्वतः स्वतःचे अता सावरायचे आहे

जरी सुरू पानगळ... दूर पाखरे गेली
पुन्हा पुन्हा तू नवे पालवायचे आहे

ऋतू असो वा नसो काळजी कशाला ही
कळ्या कळ्यांना खरे तर फुलायचे आहे

प्रभात होण्या नवी... दान द्यायचे आहे
नव्या नव्याने मला मावळायचे आहे

संजय कुळये
रत्नागिरी
मो. 9860096030
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=