Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या यशवंतांचा गौरव

स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या यशवंतांचा सत्कार
----------------------------------------
अक्कलकुवा दि २८ (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी ) या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या वकिलांचा सत्कार समारंभ अक्कलकुवा व धडगाव वकिल संघाचे पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम तालुक्यातील डाब देवगोई याहा मोगी माता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी यहा मोगी मातेच्या मंदिरात जाऊन पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड.रुपसिंग वसावे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.एन.एस.शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.राजेंद्र इंदिस , अ‍ॅड.जगदीश कुवर ,अ‍ॅड .आर.आर.मराठे, अ‍ॅड.सचिन राणे, अ‍ॅड.रवींद्र वसावे , अ‍ॅड.संग्राम पाडवी,अ‍ॅड.बापु पावरा हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहाय्यक अभियोक्ता म्हणून निवड झालेल्या अ‍ॅड.ईश्वर वळवी,अ‍ॅड.रोहिदास पाडवी,अ‍ॅड.पी.आर.ठाकरे, अ‍ॅड.गोमता पावरा, अ‍ॅड.दिलीप वळवी,अ‍ॅड.चेतन वळवी, अ‍ॅड. कुवरसिंग वळवी, अ‍ॅड.वनिता वळवी, अ‍ॅड.लक्ष्मी पावरा आधीचा सत्कार करण्यात आला यावेळी अ‍ॅड.राजेंद्र इंदिस , अ‍ॅड.जगदीश कुवर ,अ‍ॅड .आर.आर.मराठे, अ‍ॅड. अ‍ॅड.सचिन राणे, अ‍ॅड.संग्राम पाडवी अ‍ॅड.वसंत वळवी, यांनी मनोगत व्यक्त केले
ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एन. एस.शेख यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, गरीबी यशाच्या आड येत नाही.फक्त सतत अभ्यास,प्रामाणिकपणा,विनम्रता अंगी बाळगून जिद्दीने परिस्थितीला अनुकूल करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. तेव्हा यश हमखास मिळते असे त्यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.गजमल वसावे यांनी केले तर आभार अ‍ॅड छोटू वळवी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीते साठी अक्कलकुवा व धडगाव वकील संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.