सभासद आणि ठेवीदारांच्या बळावर काकासाहेब पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण -
नंदुरबार दि २४ (प्रतिनिधी) सभासद आणि ठेवीदारांच्या बळावर काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेने पंचवीस वर्षे पूर्ण करून रौप्य महोत्सवी वर्षात यशस्वीरित्या पदार्पण केले. पंचवीस वर्षात तब्बल पन्नास कोटी अनामत रक्कम असून चालू आर्थिक वर्षात पाच कोटी 54 लाख रुपये नफा प्राप्त झाला आहे. असे प्रतिपादन पतसंस्थेचे संचालक आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले.
येथील तैलिक मंगल कार्यालयात काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व ज्येष्ठ नेते हिरालालकाका चौधरी होते. प्रारंभी पतसंस्थेचे सचिव मोहन चौधरी यांनी इतिवृत्त वाचून प्रस्तावना केली. सभासदांच्या वतीने निवृत्त शिक्षक प्रकाश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. काकासाहेब हिरालाल चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हाईस चेअरमन पांडुरंग सोनार, संचालक शिरीष चौधरी, सौ.अनिता चौधरी, सुजाता भावसार, दिलीप चौधरी, डॉ. विशाल चौधरी, अमृत चौधरी, हसमुख बागुल, रवी महिदे, जितेंद्र गोसावी आदीं उपस्थित होते.
आभार अनिता चौधरी यांनी मानले.
वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीतेसाठी काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.