Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चोरी ऊपर से सीनाजोरी;आरोपी एमडी राजाराम पाटील यांची फाशी घेण्याची धमकी!एमडी मेला तरी आम्ही युनियनवाल्यांना साथ देणार: कामगार आक्रमकपाचव्या दिवशीही सुतगिरणी कामगारांचा संप सुरूच!

सुतगिरणी कामगारांचा पाचव्या दिवशीही सुतगिरणी कामगारांचा संप सुरूच!

शहादा दि २६(प्रतिनिधी) सुतगिरणीचे एमडी राजाराम दुल्लभ पाटील यांनी दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी संपाचे बॅनर फाडून एका कामगारास मारहाण केली होती,आरोपी राजाराम पाटील विरोधात पोलीस ठाणे शहादा येथे कलम ३२३,५०४,५०६ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमडी राजाराम दुल्लभ पाटील यांनी आमचे पैसे हळप करून करोडो रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. सुतगिरणी कामगार युनियनच्या शिष्टमंडळानी काल दिवसभर एमडीशी चर्चा केली तेव्हा एमडी राजाराम पाटील हे आमच्या मागण्या तर मान्य करीत नाहीत,उलट मी फाशी घेतो,अशी धमकी देऊन आमच्यावर दबाव आणतात , अशी व्यथा कामगार युनियनचे अध्यक्ष जगन निकुंभ यांनी कामगारांना सांगून दाखवली.
              एमडी राजाराम पाटील फाशी घेऊन मेला तरी आम्ही युनियन वाल्यांना साथ देणार, युनियन वाल्यांच्या बाजूने जवाब देणार अशी प्रतिक्रिया कामगार खंडू गंगाराम पाटील यांनी दिली.एमडी युनियनवाल्यांना फाशी घेण्याची धमकी देतो, त्याऐवजी आम्ही कामगार मरून जातो, सगळी प्रॉपर्टी तुझी होऊन जाईल, नाहीतरी तु आम्हाला लुबाडून मारतच आहे,कालपर्यंत पीएफ द्यायला पैसे नाहीत, असे एमडी राजाराम पाटील बोलत होता,आता ५ महिन्यांचा पीएफ देतो,असे बोलतो,हा काळाधन कुठून काढतो आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया कामगार विजय काशीनाथ पाटील यांनी दिली.एमडीने कामगारांवर व युनियन पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकू नये,आमचे पैसे आम्हाला द्यावेत, आमचे भविष्य खराब करू नये,असे बजरंग सिंग पटेलट म्हणाले.
                  मी २००३ पासून सुतगिरणीत कामाला आहे,माझा फक्त ५ रूपये पगार यांनी वाढवला,आमची अडचण एमडी समजून घेत नाहीत, अशी व्यथा महिला प्रतिनिधी कांता पावरा यांनी दिली.संपाला ५ दिवस झाले,आम्ही आमचे घरदार सोडून येथे बसलो आहे,आमचे नुकसान यांनी केले आहे,आम्ही तडजोड करायला,मार्ग काढायला तयार होतो,परंतु एमडी मागण्यांवर मार्ग न काढता आमच्या युनियन वाल्यांना फाशी घेतो म्हणून धमकावतो ,काही झाले तरी आम्ही हा संप सुरूच ठेवणार आहोत, युनियन सोबत राहणार आहोत,अशी प्रतिक्रिया कामगार पांडूरंग साळुंखे यांनी दिली.