राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत टपाल तिकिटाचे प्रकाशन
नंदनगरीत ओम शांती परिवारातर्फे समाधान
दादी प्रकाशमणीजीं पुण्यतिथीनिमित्त "जागतिक बंधुता दिवस"
नंदुरबार दि २७ (प्रतिनिधी) माउंट आबू राजस्थान येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माजी मुख्य प्रशासक राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या 16 व्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या प्रतिमेच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते करण्यात आले.याबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील ओम शांती परिवारातील साधकांनी समाधान व्यक्त केले आहे.अशी माहिती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे मीडिया विंग नंदुरबार जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे यांनी दिली.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माजी मुख्य प्रशासक राजयोगिनी दादी प्रकाशमणी जी यांच्या 16 व्या पुण्यतिथीनिमित्त (25 ऑगस्ट ) रोजी ब्रह्माकुमारी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सेवा केंद्राच्या संचालिका, ब्रह्माकुमारी विद्यादीदी यांनी दादी प्रकाशमणीजीं संदर्भातील आठवणी सांगतांना म्हणाल्या की, दादीजींमधली नेतृत्व क्षमता इतकी अद्भुत होती की, त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या 140 ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी बंधू-भगिनींनी आपले जीवन भगवंताच्या सेवेत समर्पित केले. देशांमध्ये 8000 हून अधिक शाखा आहेत. दादीजींचे संपूर्ण जगावर प्रेम होते आणि त्यांनी जगभरात शांततेचा संदेश दिला, यासाठी त्यांना 1987 मध्ये वर्ल्ड पीस अॅम्बेसेडर आणि फाइव्ह पीस अॅम्बेसेडर पुरस्कारही मिळाले. त्यांची पुण्यतिथी दरवर्षी जागतिक बंधुता दिन म्हणून साजरी केली जाते दादी प्रकाशमणी असे सेनापती होते.दादीजी हे कुशल ज्वेलर होते. प्रत्येकाला प्रेम आणि आदर देऊन ती प्रत्येकाच्या गुणांची आणि गुण वैशिष्ट्यांची पारख करीत असत असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी प्रकाशमणी दादींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व साधक उपस्थित होते.